Navle Bridge Car Accident: पुण्यात नवले पूलावर पुन्हा भीषण अपघात; 8-9 गाड्यांची एकमेकांना धडक

अपघातातील जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Accident | Twitter

पुण्यात नवले पूलावर पुन्हा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये सउमारे 8-9 गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याची वाहनांना धडक बसली आणि हा विचित्र अपघात झाला. सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे अंमलदार आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहने बाजूला केली आहेत. अपघातातील जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement