Nashik Violence: बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंददरम्यान नाशिकमध्ये दगडफेक; परिस्थिती आता नियंत्रणात, पोलीस बंदोबस्त तैनात

यावरून दोन गटात वाद झाला. भद्रकाली परिसरात काढण्यात आलेल्या निषेध रॅलीवर काही कट्टरवाद्यांनी दगडफेक केली.

Nashik Police (Photo Credit: X/@ANI)

Nashik Violence: बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात संपूर्ण हिंदू समाजाने शुक्रवारी (16 ऑगस्ट 2024) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. बंददरम्यान नाशिक आणि जळगावमध्ये दगडफेकीमुळे तणाव पसरला आहे. दोन्ही ठिकाणांहून अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दिलीप ठाकूर म्हणतात, ‘परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण आता शांतता आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.’ (हेही वाचा: Bangladesh Crisis: बांगलादेशचे नवे प्रमुख Muhammad Yunus यांचा PM Narendra Modi यांना फोन; दिले हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांचे संरक्षण आणि सुरक्षेचे आश्वासन)

पहा पोस्ट-