Nashik Crime: नाशिक पोलिसांच्या तावडीतून फिल्मी स्टाईलने निसटून गेला होता प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपी; अवघ्या 24 तासांत पुन्हा घेतले ताब्यात (Video)

भ्रदकाली पोलिसांनी क्रिश शिंदे या आरोपीला अटक केली होती. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली व त्यानंतर पोलीस त्याला ठाण्यात आणत असताना तो पोलिसांच्या हातून निसटला.

Nashik Crime

नाशिक पोलिसांच्या तावडीतून प्राणघातक हल्ला प्रकरणातील एक आरोपी, अगदी फिल्मी स्टाईलने निसटून गेल्याची घटना घडली होती. याचा एक व्हिडीओदेखील समोर आला होता, ज्यामध्ये आरोपी पोलिसांच्या हाताला हिसका देऊन, हवेत सूर मारून मित्राच्या स्कूटरवरून जाताना दिसतो. क्रिश किरण शिंदे असे या आरोपीचे नाव असून, तो मंगळवारी (29 एप्रिल) दुचाकीचालक साथीदाराच्या मदतीने फरार झाला होता. आता पोलिसांनी अवघ्या 24 तासांत त्याला शोधून काढले असून, इगतपुरी भागातील जंगलाच्या परिसरातून त्याला ताब्यात घेतले.

अहवालानुसार, भ्रदकाली पोलिसांनी क्रिश शिंदे या आरोपीला अटक केली होती. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली व त्यानंतर पोलीस त्याला ठाण्यात आणत असताना तो पोलिसांच्या हातून निसटला. त्याचवेळी त्याचा मित्र किरण युवराज परदेशी हा दुचाकी घेऊन त्याची वाट पाहत होता. क्रिश त्याच्या दुचाकीवर बसून पळून गेला. क्रिशने स्कुटीवर उडी घेत धूम ठोकली व यामुळेच हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर एकदम व्हायरल झाले. तपोवन रोडवरील जयशंकर चौकात फिर्यादी अमोल अरुण हिरवे यांच्यावर कोयत्याने हल्ला प्रकरणी, संशयित क्रिश शिंदेला ताब्यात घेतले होते. (हेही वाचा: New Metro Variant for Nashik City: नाशिक शहरासाठी मेट्रोचा नवीन कॉम्पॅक्ट प्रकार शोधण्यास महा मेट्रोची सुरुवात; शासनाला पाठवला जाणार नवा आराखडा)

Nashik Crime:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement