Nanded Accident: लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात; नववधूसह आठ जणांचा जागीच मृत्यू
या अपघातामध्ये नववधूसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे
नांदेड जिल्ह्यातील भोकर ते हिमायतनगर रस्त्यावर लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये नववधूसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले. अहवालानुसार हा अपघात आज सायंकाळी 7 वाजता झाला. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना भोकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)