नागपूर येथील तीन मुंडी चौकातील राहत्या घरी दहावीत शिकणाऱ्या 15 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रुद्राक्ष मेश्राम असे मृताचे नाव असून त्याने मंगळवारी हे कठोर पाऊल उचलले, असे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही, तसेच मुलाकडे मोबाईल फोनही नव्हता, त्यामुळे रुद्राक्षने जीवन संपवण्याचा निर्णय घेण्यामागचे कारण समजू शकले नाही. अहवालानुसार रुद्राक्ष आणि त्याच्या आईमध्ये ट्युशन फीबाबत वाद झाला होता, यामुळे त्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे. आईने त्याला शिकवणी फी भरण्यासाठी पैसे दिले होते, या पैशांबाबत तिने त्याच्याकडे विचारणा केली होती.
अहवालानुसार, बुधवारी रुद्राक्षची परीक्षा होती. त्यादिवशी त्याच्या आईने त्याला ट्यूशन फी म्हणून 1500 रुपये दिले होते. मात्र रुद्राक्षने शिकवणी शिक्षकाला त्यातील 1,000 रुपये दिले व उर्वरीत 500 रुपये आपल्याकडे ठेवले. जेव्हा त्याला आईने या 500 रुपयांबद्दल विचाराल्रे तेव्हा त्याच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. त्यानंतर त्याने आईच्या साडीसह पंख्याला लटकून आत्महत्या केली. रुद्राक्षचे वडील एका ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करतात. गरिबी हे आत्महत्येमागील कारण असू शकते असे पोलीस म्हणाले. (हेही वाचा: Sahil Nandedkar Dies Of Suicide: पोलिस उपायुक्तांच्या एकुलत्या 17 वर्षीय मुलाने गळफास लावत संपवलं आयुष्य; छत्रपती संभाजीनगर मधील घटना)
नागपूरमध्ये दहावीच्या मुलाची आत्महत्या-
A 15-year-old student of Class 10 allegedly died by suicide at his residence at Teen Mundi Chowk in Sadar. The deceased, identified as Rudraksh Meshram, took the drastic step, said police
Know more🔗https://t.co/sHO31wfUQH #Nagpur #Maharashtra pic.twitter.com/Q0WizUXoXM
— The Times Of India (@timesofindia) October 20, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)