VIDEO: समृद्धी महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर जवळील मार्गिकेवरच्या भेगेची सरकारकडून तातडीने दुरुस्ती
नागपूर-मुंबई समृद्धी द्रुतगती मार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील खड तडे दुरुस्त करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी गुरुवारी कळविले आहे.
महाराष्ट्रातील शिंदे सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट मानल्या जाणाऱ्या 'समृद्धी महामार्ग'मध्ये तडे दिसू आले होते. 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी प्रकल्पावर सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले असले तरी या महामार्गाला 50 फूट लांब आणि 3 सेमी रुंद दरड दिसत होती. मात्र आता नागपूर-मुंबई समृद्धी द्रुतगती मार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील खड तडे दुरुस्त करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी गुरुवारी कळविले आहे. या ठिकाणी वाहतुकीस कुठलाच धोका नसून आजूबाजूचे कोणतेही पॅनल खराब झाल्याचे निदर्शनास आले नाही.पत्रकारांशी बोलताना भुसे म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या एक्स्प्रेस वेच्या 600 किलोमीटरच्या मार्गावर आणखी खड्डे आहेत का, याचा शोध घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. (हेही वाचा: राज्यातील ऑटोरिक्षा-टॅक्सी चालकांना दिलासा; वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)