Municipal Council, Nagar Panchayat By-Elections: नगरपरिषद, नगरपंचायतीमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 19 ऑगस्टला होणार मतदान; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

रविवारी सुटीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत.

Municipal Council, Nagar Panchayat By-Elections

Municipal Council, Nagar Panchayat By-Elections: विविध नगरपंचायती व एका नगरपरिषदेतील एकूण 11 सदस्य पदांच्या रिक्त जागांसाठी आणि हातकणंगले (जि. कोल्हापूर) नगरपंचायतीच्या थेट अध्यक्षपदाच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी 11 ऑगस्ट 2024 रोजी मतदान होणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. खालापूर, पाली (जि. रायगड), निफाड, सुरगाणा (जि. नाशिक), बोदवड (जि. जळगाव), धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु. (जि. नंदुरबार), कवठेमहांकाळ, खानापूर (जि. सांगली), चंदगड (जि. कोल्हापूर) आणि बाभूळगाव (जि. यवतमाळ) या नगरपंचायतींच्या सदस्यपदांच्या प्रत्येकी एका रिक्त जागेसाठी मतदान होईल. त्याचबरोबर कन्हान-पिपरी (जि. नागपूर) नगरपरिषदेच्या सदस्यपदाच्या एका रिक्त जागेसाठी देखील मतदान होणार आहे.

नामनिर्देशनपत्रे 18 ते 24 जुलै 2024 या कालावधीत स्वीकारली जातील. रविवारी सुटीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. 25 जुलै 2024 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. 11 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 12 ऑगस्ट 2024 रोजी मतमोजणी होईल, असेही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. (हेही वाचा: Maharashtra MLC Election Results: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महायुतीने मारली बाजी; सर्व 9 उमेदवार विजयी)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)