Mumbai Weather Forecast: मुंबईत पाऊस; शहरात मान्सून पूर्व सरी बरसण्याच्या पार्श्वभूमीवर पहा कसे असेल उद्याचे हवामान!
मुंबई च्या अनेक भागामध्ये आज सकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईकर उन्हाच्या काहिलीने हैराण असताना आता पाऊस कधी पडणार? याची उत्सुकता त्यांना लागली आहे. आज सकाळी राज्यात काही ठिकाणी मान्सून पूर्व सरी बसरल्यानंतर आता राज्याच्या उंबरवठ्यावर मान्सून आल्याचे संकेत मिळत आहे. मुंबईत पाऊस 5, 6 जून दरम्यान येणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे उद्याचे हवामान देखील ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. हलका पाऊस, सोबत मेघा गर्जना होण्याचा अंदाज आहे. मुंबई शहर आणि आजुबाजूच्या भागात आठवड्याच्या शेवटापर्यंत पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. हा मान्सूनपूर्व पाऊस शहरात तात्पुरता नागरिकांना उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा देत असल्याचं चित्र आहे. नक्की वाचा: Mumbai Rain Update: मान्सून पूर्व पावसाची हजेरी, दादर आणि लगतच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज .
मुंबई मध्ये पाऊस कधी येणार? पहा उद्याचा हवामान अंदाज
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)