Mumbai Water Cut: येत्या 4 ते 5 जानेवारी दरम्यान मुंबईमधील मलबार हिल, दादर, लोअर परळ, कुर्ला, पवईसह अनेक भागात पाणीकपात

बाधित क्षेत्रांमध्ये मलबार हिल जलाशय आणि आझाद मैदान जलाशयातून पाणी पुरवले जाणारे अ वॉर्डमधील सर्व झोन समाविष्ट आहेत,

Mumbai Water | representative pic- (photo credit -pixabay)

Mumbai Water Cut: देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे नवी मुंबईमधील काही परिसरातील पाणीपुरवठा तात्पुरता थांबवला जाणार असल्याची बातमी आली होती. आता माहिती मिळत आहे की, मुंबईमधील पाणीपुरवठ्यावरही पैनाम होणार आहे. पवई व्हेंचरीजवळ अप्पर वैतरणा आणि वैतरणा मुख्य दरम्यान क्रॉस कनेक्शनवर गळती आढळून आली आहे. नागरी कर्मचार्‍यांनी ही गळती दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु आज ते शक्य झाले नाही. आता वैतरणा जलवाहिनी दुरूस्तीचे काम गुरूवार 4 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 ते शुक्रवार 5 जानेवारी 2024 सकाळी 10, म्हणजे 24 तासांसाठी घेण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे शहरातील अनेक ठिकाणच्या पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होऊ शकतो.

बाधित क्षेत्रांमध्ये मलबार हिल जलाशय आणि आझाद मैदान जलाशयातून पाणी पुरवले जाणारे अ वॉर्डमधील सर्व झोन समाविष्ट आहेत, जिथे पाणीपुरवठ्यात 10% कपात होईल. तसेच अप्पर तुंगा, लोअर तुंगा, रहेजा विहार, चांदिवली फार्म रोड, साकी विहार रोड, साकीनाका, चांदिवली फार्म रोड, नाहर अमृत शक्ती, आयआरबी रोड, संघर्ष नगर खैराणी रोड, मोहिली पाइपलाइन रोड यांसारख्या काही भागांना 4 ते 5 जानेवारी दरम्यान पाणीपुरवठा होणार नाही. या वॉर्डातील नागरिकांनी याची नोंद घेऊन पाण्याचा साठा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (हेही वाचा; No Water Supply In Navi Mumbai: नवी मुंबईमध्ये 5 आणि 6 जानेवारीस पाणीपुरवठा खंडीत)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)