Mumbai Water Cut: तानसा पाईपलाईन लीकेज मुळे मुंबईच्या काही भागात पाणी पुरवठा बंद; पहा कोणकोणते भाग प्रभावित

सध्या मुंबई मध्ये एस वॉर्ड, के ईस्ट वॉर्ड, जी नॉर्थ आणि एच इस्ट वॉर्ड मध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

Water Cut | Pixabay.com

मुंबई मध्ये जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड ब्रीज वर तानसा पश्चिमेकडील पाईपलाईन पवई भागात फूटल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी झालेल्या या घटनेनंतर तातडीने पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. सध्या पाईपलाईनचं काम सुरू असून तातडीने हाती घेण्यात आलेले हे काम पूर्ण होण्यासाठी किमान 24 तासांचा कालावधी लागू शकतो अशी माहिती बीएमसीने दिली आहे. या कामामुळे पवई ते धारावी दरम्यानचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. पाणी बंद करण्यात आल्याने सध्या मुंबई मध्ये एस वॉर्ड, के ईस्ट वॉर्ड, जी नॉर्थ आणि एच इस्ट वॉर्ड मध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. बीएमसीने या भागातील नागरिकांना जपून आणि काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन केले आहे.

 तानसा ची पाईपलाईन फुटली 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

A post shared by माझी Mumbai, आपली BMC (@my_bmc)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement