Mumbai: आषाढी एकादशीनिमित्त मुंबईमध्ये वाहतूक कोंडीची शक्यता; अनेक ठिकाणी असेल 'No Entry', घ्या जाणून

हे वाहतूक नियम 9 जुलै ते 11 जुलै सकाळी 8 वाजेपर्यंत लागू असतील.

मुंबई रहदारी, प्रतिकात्मक छायाचित्र (Photo credits: PTI)

10 जुलै रोजी साजरी होणार्‍या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी नवीन वाहतूक निर्देशांची अधिसूचना जारी केली. या दिवशी विठ्ठल मंदिराच्या परिसरात यात्रा किंवा धार्मिक मिरवणूक अपेक्षित आहे. मुख्यत्वे वडाळा परिसरात मोठ्या संख्येने भाविक एकत्र येतात, त्यामुळे इथल्या विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार आहे. या सर्व गोष्टी ध्यानात घेऊन काही काळासाठी शहरातील अनेक भागात 'नो-एन्ट्री' असणार आहे. हे वाहतूक नियम 9 जुलै ते 11 जुलै सकाळी 8 वाजेपर्यंत लागू असतील. दादर टीटी ते टिळक रोड आणि कात्रक रोडच्या जंक्शनवर ‘नो-एंट्री’ असणार आहे. ही वाहतूक डॉ बी ए रोडकडे (रुईया जंक्शन मार्गे उत्तरेकडे) वळवली जाईल.

या ठिकाणीही असेल नो एन्ट्री-

कात्रक रोड ते देविड बरेटो सर्कल आणि जीडी आंबेडकर मार्गाचे जंक्शन आणि टिळक रोड (उत्तर ते दक्षिण).

टिळक रस्ता एक्स्टेन्शन सहकार नगर गल्ली ते कात्रक रस्त्याकडे (पूर्वेकडून पश्चिमेकडे)

पारसे कॉलनी रोड क्र. 13 आणि 14, आणि लेडी जहांगीर रोडचे जंक्शन

दिनशॉ रोड आणि मंचरजी जोशी मार्ग आणि कात्रक रोडचा जंक्शन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now