Mumbai Traffic Block: मध्य रेल्वेकडून 2 ते 6 ऑक्टोबर दरम्यान मध्यरात्रीचा ट्रॅफिक ब्लॉक जाहीर; जाणून घ्या लोकल ट्रेनच्या वेळा व इतर तपशील

सध्या, बेलापूर आणि पनवेल दरम्यान 38 तासांचा ब्लॉक सुरू आहे आणि सोमवार, 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 च्या सुमारास तो संपेल, त्यानंतर मध्यरात्री हा नवा ब्लॉक सुरू होईल.

मुंबई लोकल ट्रेन (Photo Credits: PTI)

मध्य रेल्वेने 2 ते 6 ऑक्‍टोबरच्या रात्रीपासून मध्यरात्रीचा ट्रॅफिक ब्लॉक जाहीर केला आहे. याचा बेलापूर आणि पनवेल स्थानकांदरम्यानच्या रेल्वे सेवेवर परिणाम होणार आहे. हा पाच दिवसांचा ब्लॉक पनवेल स्थानकावरील उपनगरीय रेल्वे यार्डचे रीमॉडेलिंग आणि डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी दोन नवीन मार्गांचे बांधकाम सुलभ करण्यासाठी आवश्यक आहे. सध्या, बेलापूर आणि पनवेल दरम्यान 38 तासांचा ब्लॉक सुरू आहे आणि सोमवार, 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 च्या सुमारास तो संपेल, त्यानंतर मध्यरात्री हा नवा ब्लॉक सुरू होईल.

मध्यरात्री ब्लॉक दरम्यान, बेलापूर आणि पनवेल स्थानकांदरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा 2 ऑक्टोबरच्या रात्रीपासून ते 7 ऑक्टोबर 2023 च्या पहाटेपर्यंत रात्री 00:30 ते पहाटे 05:30 पर्यंत तात्पुरत्या रद्द केल्या जातील. ब्लॉक कालावधीत डाऊन हार्बर मार्गावर पनवेलसाठी जाणारी शेवटची लोकल ट्रेन सीएसएमटी येथून रात्री 10.58 वाजता सुटेल व पनवेल येथे रात्री 12.18 वाजता (मध्यरात्री) पोहोचेल. (हेही वाचा: Mumbai Local Power Block On Harbour Line: हार्बर मार्गावर 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान बेलापूर- पनवेल स्थानकामध्ये 38 तासांचा ब्लॉक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now