Maharashtra SSC Board Exams 2023: जिद्दीच्या बळावर अपघातानंतरही Mubashira ने दिला अॅम्ब्युलंस मधून दहावीचा पेपर; नंतर करून घेतलं ऑपरेशन
सध्या तिच्या जिद्दीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
मुंबईच्या वांद्रे परिसरात अपघातग्रस्त विद्यार्थीने अॅम्ब्युलन्स मधून 10वी चा पेपर दिला. नंतर ऑपरेशन करून घेतल्याची एक घटना समोर आली आहे. अंजुमन-ए-इस्लाम च्या डॉ एमआईजे गर्ल्स हाई स्कूल ची विद्यार्थीनी मुबश्शिरा सैय्यद चा घरी परतत असताना अपघात झाला होता. आता दहावीचे उर्वरित 2 पेपर देखील ही विद्यार्थीनी अॅम्ब्युलंस मधूनच देणार आहे. अपघातामुळे परीक्षेला ती मुकू नये म्हणून तिच्या शाळेनेच ही व्यवस्था केली आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)