Mumbai School Holiday: मुंबईमध्ये उद्याही मुसळधार पावसाचा इशारा; रेड अलर्ट जारी, 26 सप्टेंबर रोजी BMC व TMC क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, मुंबई तसेच ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या, गुरूवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

Mumbai School Holiday: मुंबईमध्ये उद्याही मुसळधार पावसाचा इशारा; रेड अलर्ट जारी, 26 सप्टेंबर रोजी BMC व TMC क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
School students. (Credits: PTI | Representational Image)

Mumbai School Holiday: भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला उद्या (२६ सप्टेंबर २०२४) सकाळी ८.३० पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, मुंबई तसेच ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या, गुरूवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई आणि ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.मुंबईत आज दिवसभर पावसाची हजेरी आहे. संध्याकाळच्या वेळी पावसाचा जोर वाढल्याने त्याचा परिणाम मुंबई लोकल सेवेवर झाल्याचे दिसले. (हेही वाचा: Mumbai Rains: मुंबईतील पावसाचा विमानसेवेवर परिणाम; दोन उड्डाणे वळवली, SpiceJet ने दिला विलंबाचा इशारा)

26 सप्टेंबर रोजी बीएमसी आणि टीएमसी क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर- 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 25, 2024 11:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).