Mumbai Road Accident: मुंबईच्या सायन परिसरात भरधाव कारने दिली वृद्ध महिलेला धडक; पिडीतेचा उपचारादरम्यान मृत्यू (VIDEO)
अपघातावेळचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, एक कार भरधाव वेगाने येऊन महिलेला जोरात धडकते व त्यामुळे महिला बेशुद्ध होऊन रस्त्यावर पडते.
मुंबईतील सायन परिसरात भरधाव कारने एका वृद्ध महिलेला धडक दिली आहे. एका कार चालकाने या महिलेला मागून इतकी जोरदार धडक दिली की ती जखमी होऊन रस्त्यावर खाली पडली. त्यानंतर लोकांनी महिलेला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. मात्र अपघातानंतर एका दिवसात महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातावेळचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, एक कार भरधाव वेगाने येऊन महिलेला जोरात धडकते व त्यामुळे महिला बेशुद्ध होऊन रस्त्यावर पडते. जेव्हा ड्रायव्हरकडे विचारणा केली गेली तेव्हा त्याने महिला आधीच बेशुद्ध झाल्याचे सांगितले होते. मात्र या घटनेच्या व्हिडिओद्वारे सत्य समोर आले आहे. (हेही वाचा: Mumbai: मुंबईतील चांदिवलीत भरधाव दुचाकी कारला धडकल्याने दोन जखमी; 3 दिवसात दुसरी घटना, Watch Video)
Mumbai: Driver Knocks Down Elderly Woman, Cooks Up Story Of Her Fainting Before His Car; Victim Dies A Day Later#Mumbai #Sion @aishooaaram pic.twitter.com/tyFa26Uc4O
— Free Press Journal (@fpjindia) September 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 18, 2023 11:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

