Mumbai Rains: मुंबईच्या भर जोरदार पावसात वाहतूक कोंडी मधून बाहेर पडण्यासाठी गृहराज्यमंत्री Yogesh Kadam यांनी केला Mumbai Metro ने प्रवास

पावसामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या मंत्री योगेश कदम यांनी मुंबई मेट्रोने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. वायरल व्हिडिओ मध्ये त्यांच्यासोबत मेट्रोत सुरक्षा व्यवस्था देखील असल्याचं समोर आलं आहे.

Yogesh Kadam | (Photo credit: archived, edited, representative image)

मुंबई मध्ये  मंगळवारी संध्याकाळी जोरदार मान्सूनपूर्व सरी बरसल्या. मुंबईकरांच्या घरी परतण्याच्या वेळी पावसाचं धूमशान सुरू झाल्याने अनेक भागात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली होती. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम देखील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मेट्रोने प्रवास करताना दिसले. त्यांनी मुंबई मेट्रोने प्रवास केला त्याचे काही फोटोज आणि व्हिडिओज सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल झाले आहेत. नक्की वाचा: Maharashtra Weather Update: मुंबईसह कोकणात पुढील चार दिवस यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा.  

मंत्री योगेश कदम यांचा मेट्रो प्रवास

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement