Mumbai Rain Update: पुढील 24 तासांमध्ये मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता; IMD ने वर्तवला ऑरेंज अलर्टचा अंदाज
बिपरजॉय चक्रीवादळामुळे यंदा मान्सूनला विलंब झाला आहे. मुंबईकर मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही प्रतीक्षा आता संपणार आहे.
कडक उन्हाचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना शनिवारी पावसाने काहीसा दिलासा दिला. शनिवारी दिवसभर शहर व उपनगरातील अनेक भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. प्रादेशिक हवामान विभागाने याचे वर्णन मान्सूनपूर्व पाऊस असे केले आहे. रविवारी किंवा सोमवारी मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये मान्सून दाखल झाला आहे. मुंबईत पोहोचण्यासाठी अजून 48 तास लागू शकतात. दुसरीकडे, मुंबईसाठी आयएमडीने पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याचा अर्थ मुंबईमध्ये उद्याही मुसळधार पावसाची शक्यता आहे. बीएमसीने याबाबत माहिती दिली आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे यंदा मान्सूनला विलंब झाला आहे. मुंबईकर मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही प्रतीक्षा आता संपणार आहे. (हेही वाचा: Maharashtra Weather Update: राज्यात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; अनेक शहरांत ऑरेंज अलर्ट जारी)