Mumbai-Pune Train Cancelled: मुसळधार पावसामुळे मुंबई व पुणे दरम्यान अनेक ट्रेन्स रद्द, पहा संपूर्ण यादी (See List)

पुढील दोन दिवस मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे अनेक परिसरातील रुळांवर पाणी साचल्याने या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

Indian Railways | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकणात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. अशात याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवरही झाला आहे. आता मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे व यामुळे पुणे-मुंबई मार्गावरील अनेक गाड्या दोन दिवसांसाठी रद्द केल्या गेल्या आहेत.

रद्द झालेल्या गाड्यांमध्ये डेक्कन क्विन, सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, इंटरसिटी, इंद्रायणी एक्सप्रेस यांचा समावेश आहे. यामुळे या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे अनेक परिसरातील रुळांवर पाणी साचल्याने या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. (हेही वाचा: Heavy Rains in Mumbai: मुंबईत मुसळधार पावसात बाळ पाण्यासोबत वाहून गेले, मातेचा हंबडा पाहून चुकला अनेकांच्या काळजाचा ठोका)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now