ठाकरे गट, एनसीपीच्या आज जागतिक गद्दार दिन साजरा करण्याच्या मागणी वरून मुंबई पोलिसांनी आंदोलकांना बजावल्या नोटिसा

मुंबई पोलिसांनी ठाकरे गट आणि एनसीपीच्या कार्यकर्त्यांना कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून वॉर्निंग देण्यास सुरूवात केली आहे.

Mumbai Police Logo | (Photo Credits: File Image)

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली सुरत मार्गे गुवाहाटीला गेले. या शिवसेनेतील मोठ्या बंडखोरीला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. यावरूनच ठाकरे गट आणि एनसीपी कार्यकर्ते आक्रमक होत हा दिवस "International Traitors Day" म्हणून घोषित करण्यावर ठाम आहेत. काही ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. पण यामुळे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनी नोटिसा जारी करण्यास सुरूवात केली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now