Mumbai: अखेर वाहतुकीसाठी खुला झाला गोखले पुलाला जोडणाऱ्या सीडी बर्फीवाला उड्डाणपुलाचा काही भाग (Watch Video)

गोखले पुलाला जोडणाऱ्या सीडी बर्फीवाला उड्डाणपुलाचा काही भाग गुरुवारी सायंकाळी उघडण्यात आला. पहिल्या दिवशी अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नागरी अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळी पाहणी केली.

गोखले पुलाला जोडणाऱ्या सीडी बर्फीवाला उड्डाणपुलाचा काही भाग वाहतुकीसाठी खुला

अंधेरी हे मुंबईचे महत्त्वाचे उपनगर आहे. अंधेरीच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा गोखले पूल निकामी झाल्याने प्रशासनाला मोठा पेच सहन करावा लागला. त्याचबरोबर या भागात वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य मुंबईकरांना दररोज त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता गुरुवारपासून मुंबईकरांना यातून दिलासा मिळणार आहे. गोखले पुलाला जोडणाऱ्या सीडी बर्फीवाला उड्डाणपुलाचा काही भाग गुरुवारी सायंकाळी उघडण्यात आला. पहिल्या दिवशी अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नागरी अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळी पाहणी केली. अंधेरी पूर्व व पश्चिम प्रवासासाठी सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग अंशतः उचलून तो गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या समांतर उंचीवर जोडण्याचे आव्हानात्मक काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने 78 दिवसांच्या विक्रमी कालावधीत पूर्ण केले आहे. (हेही वाचा: Mumbai: अंधेरीमध्ये जोगेश्वरी-गुंदवली फ्लायओव्हरचा स्लॅब कारवर पडला, कोणतीही जीवितहानी नाही)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement