Mumbai: अंधेरीमध्ये जोगेश्वरी-गुंदवली फ्लायओव्हरचा स्लॅब कारवर पडला, कोणतीही जीवितहानी नाही (Watch Video)
अंधेरी येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील जोगेश्वरी-गुंदवली फ्लायओव्हरचा स्लॅब दुपारी 3.20 च्या सुमारास कारवर पडला.
Slab of Flyover Falls on Car: पश्चिम मुंबईतील अंधेरी परिसरात गुरुवारी दुपारी एका चालत्या कारवर उड्डाणपुलाचा स्लॅब पडल्याची धक्कादायक घटना घडली. यात कोणीही जखमी झाले नाही, मात्र कारचे नुकसान झाले आहे. महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अंधेरी येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील जोगेश्वरी-गुंदवली फ्लायओव्हरचा स्लॅब दुपारी 3.20 च्या सुमारास कारवर पडला. स्लॅब कारच्या बोनेटवर पडला आणि यामुळे गाडीच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले. घटनेनंतर अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक वॉर्ड ऑफिसचे कर्मचारी मदत कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते. (हेही वाचा: Paalghar Absconding Accused Arrested: पालघरमध्ये घरे देण्याच्या नावाखाली १.१५ कोटींची फसवणूक करणाऱ्या फरार आरोपीला अटक)
पहा व्हिडिओ-
Andheri western express highway jog Gundavali flyover
Slab falls on a car
No major injury reported
Car damaged@sameeratweeter@BesuraTaansane@nnatuTOI@somitsenTOI@mayurshetty01@HoeZaay@mymalishka@Salilacharya@tajmahalfoxtrot@SachinKalbag@savitha_rao@Sahanasatianaat… pic.twitter.com/BdH1KEW2yT
— ANDHERI LOKHANDWALA OSHIWARA CITIZEN'S ASSOCIATION (@AndheriLOCA) July 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 04, 2024 06:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

