BMC: मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना मिळणार 20 हजार रुपये दिवाळी बोनस, आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची माहिती

तसेच पालिकेच्या सुमारे एक लाख दोन हजार कर्मचाऱ्‍यांना याचा लाभ मिळणार आहे.

BMC (File Image)

पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 20 हजार रुपये दिवाळी बोनस देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच पालिकेच्या सुमारे एक लाख दोन हजार कर्मचाऱ्‍यांना याचा लाभ मिळणार आहे. त्यानुसार कर्मचाऱ्‍यांना यावर्षी दसऱ्याआधीच बोनस मिळण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही 25 हजार रुपये दिवाळी बोनस देण्याची मागणी पालिका कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीने केली होती; परंतु झालेल्या बैठकीत आयुक्तांनी गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही 20 हजार रुपये बोनस दिला जाईल, असे आश्वासन मिळाले आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now