Mumbai Local Updates: मुंबई लोकल ची हार्बर लाईन वरील रेल्वेसेवा ठप्प; Chunnabhati स्थानकात पाणीच पाणी, CSMT-Thane जलद मार्गावरील सेवाही स्थगित

मुंबई लोकल रखडल्याने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांची गैरसोय होत आहे.

chunabhatti | X

मुंबई मध्ये रात्री झालेल्या तुफान पावसामुळे मुंबई लोकलची सेवा आज विस्कळीत आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रेल्वे सेवा रखडली आहे. हार्बर रेल्वे मार्गावर चुनाभट्टी स्थानकामध्ये पाणी साचल्याने हार्बर रेल्वे मार्गावरील सेवा ठप्प झाली आहे. तर मेन लाईन वर देखील रेल्वे सेवा विस्कळीत आहे. CSMT-Thane जलद मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील सेवा देखील सध्या बंद ठेवण्यात आली आहे. मुंबई लोकल रखडल्याने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांची गैरसोय होत आहे. Mumbai High Tide Low Tide Timings Today: मुंबई मध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज; पहा भरती, ओहोटीच्या वेळा! 

मुंबई लोकल विस्कळीत

चुनाभट्टी मध्ये पाणीच पाणी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)