Mumbai Local Update: माझगाव यार्ड मध्ये इंजिन रेल्वे रुळावरून घसरले; जलद मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची अप फास्ट लाईन भायखळा (Byculla) ते सीएसएमटी (CSMT) दरम्यान रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.

Mumbai Local Update: माझगाव यार्ड मध्ये इंजिन रेल्वे रुळावरून घसरले; जलद मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत
Mumbai Local Train | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई मध्ये मध्य रेल्वे मार्गावर (Central Railway Line) सध्या वाहतूक विस्कळीत झाली आहे. माझगाव यार्ड मध्ये दुपारी 12.43 च्या सुमारास इंजिन रेल्वे रूळावरून घसरलं आहे. परिणामी अप फास्ट लाईन वर भायखळा (Byculla) ते सीएसएमटी (CSMT) दरम्यान रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. सध्या अप फास्ट लाईन वरील ट्रेन स्लो मार्गावरून चालवल्या जात आहे. तसेच इंजिन हटवण्याचं काम तातडीने रेल्वे प्रशासनाने हातात घेतले आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 21, 2023 02:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).