Mumbai Local Train: 10 एसी लोकल सेवा उद्यापासून तत्त्पुरत्या बंद; त्यांच्याजागी धावणार नॉन-एसी गाड्या
एसी लोकल बंद करण्याच्या मागणीसाठी बदलापूर स्थानकावर आजही प्रवाशांनी गोंधळ घातला होता.
दोन दिवसांपूर्वी बदलापूर रेल्वे स्थानकात नेहमीच्या लोकलच्या वेळेत एसी लोकल सोडण्याच्या मुद्द्यावरून सामान्य प्रवाशांनी तीव्र आंदोलन केले होते. 5.22 वाजता बदलापूरसाठी सीएसएमटीहून सुटणारी लोकल रद्द करून त्या जागी एसी लोकल सुरू केल्याने, मुंबई अंबरनाथ, बदलापूरचे हजारो रेल्वे प्रवासी संतप्त झाले आहेत. एसी लोकल बंद करण्याच्या मागणीसाठी बदलापूर स्थानकावर आजही प्रवाशांनी गोंधळ घातला होता. आता मध्य रेल्वेने माहिती दिली आहे की, नव्याने सुरु करण्यात आलेल्या 10 एसी लोकल उद्यापासून तात्पुरत्या रद्द केल्या जाणार आहे. त्यांच्या जागी नॉन-एसी गाड्या धावतील.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)