Mumbai Local Ticket Rules: फक्त 'याच' लोकांना मिळणार मुंबई लोकलचे तिकीट, मध्य रेल्वेने केले स्पष्ट

मध्ये रेल्वेने एक आदेश जारी करत नक्की कोणाला ही तिकिटे मिळू शकतात ते स्पष्ट केले आहे

Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन असल्याचे म्हटले जाते. कोरोनामुळे मुंबईची लोकल ट्रेन थांबवण्यात आली असली तरी आता ती पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत उभी आहे. त्यात आता लोकलमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्र सरकारने आपल्या एका आदेशात स्पष्ट केले आहे की, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना  दररोज तिकीट घेऊन लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यास मुभा आहे.

त्यानंतर आता मध्ये रेल्वेने एक आदेश जारी करत नक्की कोणाला ही तिकिटे मिळू शकतात ते स्पष्ट केले आहे. त्यानुसार लसीचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झाले असणे गरजेचे आहे.