Mumbai Local On CR Updates: मध्य रेल्वेच्या मेन लाईन सिंग्नल यंत्रणेत बिघाडामुळे Byculla-CSMT दरम्यान रखडल्या लोकल (Watch Video)
सिंग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने अनेक लोकल Byculla-CSMT दरम्यान रखडल्या आहेत. अनेक प्रवाशांनी रस्त्यावर उतरून ट्रॅक मधून चालण्याचा पर्याय निवडला आहे.
पावसाच्या दिवसात आता मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मेन लाईन वर सिंग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने अनेक लोकल Byculla-CSMT दरम्यान रखडल्या आहेत. अनेक प्रवाशांनी रस्त्यावर उतरून ट्रॅक मधून चालण्याचा पर्याय निवडला आहे. दरम्यान या तांत्रिक दोषाबद्दल रेल्वे प्रशासनाकडून नीट माहिती देखील दिली जात नसल्याने प्रवासी गोंधळलेले आहेत. आज सकाळी मीरारोड आणि भाईंदर दरम्यानही तांत्रिक गडबड झाल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक उशिराने धावत होती.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)