Mumbai Local On Main Line Updates: माटुंगा-सायन स्टेशन दरम्यान तांत्रिक अडचणींमुळे वाहतूक 15 मिनिटं उशिराने

जलद मार्गावरील काही लोकल स्लो ट्रॅकवर वळवल्या आहेत यामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे.

Mumbai Local Train | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

माटुंगा स्थानकामध्ये मोटारमॅनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. बांबू ओव्हर हेड वायर वर पडल्याने मोठा अपघात होता होता वाचला आहे पण सध्या मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अप दिशेने जाणार्‍या गाड्या सकाळी 7.45 पासून रखडल्या आहेत. सुमारे 35 मिनिटांपासून ट्रेन रखडल्या होत्या. दरम्यान 8.20 पर्यंत या ट्रेन अडकून पडल्या होत्या. त्यानंतर सेवा सुरू करण्यात आली आहे. जलद मार्गावरील काही लोकल स्लो ट्रॅकवर वळवल्या आहेत यामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. Mumbai Local Train Accident: मध्य रेल्वेच्या माटुंगा स्टेशन वर मोटारमॅन च्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ (Watch Video). 

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement