मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल ट्रेनचा या रविवारी 5 जानेवारीला तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर मेन लाईनला माटुंगा-मुलुंड दरम्यान 11-4 मेगाब्लॉक आहे. हार्बर लाईन वर वाशी-पनवेल 11 ते 4 मेगाब्लॉक असणार आहे तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल 10.30 ते 3.30 मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी या ब्लॉकनुसार विकेंडला बाहेर पडून रेल्वे प्रवासाचं आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई लोकल मेगाब्लॉक
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)