Mumbai Local Mega Block: पश्चिम रेल्वेकडून 3 ऑगस्टला रात्री वसई रोड ते भाईंदर दरम्यान मेगाब्लॉक; जाणून घ्या लोकलच्या वेळेत होणारे बदल
ब्लॉक कालावधीत, विरार/वसई रोड ते बोरिवली/गोरेगाव स्थानकादरम्यान सर्व धिम्या मार्गावरील गाड्या या जलद मार्गावर चालवल्या जातील.
Mumbai Local Mega Block: ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांची देखभाल करण्यासाठी, वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर शनिवार/रविवारच्या मध्यरात्री 00.30 ते 04.00 वाजेपर्यंत, म्हणजे 03/04 ऑगस्ट रोजी जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे.पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ब्लॉक कालावधीत, विरार/वसई रोड ते बोरिवली/गोरेगाव स्थानकादरम्यान सर्व धिम्या मार्गावरील गाड्या या जलद मार्गावर चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत, काही अप आणि डाऊन उपनगरीय गाड्या रद्द राहतील. याबाबतची सविस्तर माहिती संबंधित स्टेशन मास्टर्सकडे उपलब्ध आहे. प्रवाशांनी वरील व्यवस्थेची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच यामुळे, रविवार, 04 ऑगस्ट, 2024 रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरी विभागात दिवसाच्या वेळेत कोणताही ब्लॉक असणार नाही. (हेही वाचा: Thane Hoarding Collapsed: कल्याण येथील सहजानंद येथे होर्डिंग कोसळलं, कोणतीही जीवितहानी नाही, 3 वाहनांचे नुकसान)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)