Mumbai Local Mega Block: मुंबई लोकलच्या तिन्ही लाईनवर16 जुलै दिवशी मेगाब्लॉक; इथे पहा वेळापत्रक
मध्य रेल्वेवर माटुंगा-ठाणे स्लो लाईन वर, पश्चिम रेल्वे मार्गावर राम मंदीर ते बोरिवली स्थानकादरम्यान फास्ट लाईन वर आणि हार्बर लाईन वर सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे स्थानकादरम्यान ब्लॉक असणार आहे.
मुंबईची लाईफ लाईन असलेल्या मुंबई लोकलच्या दुरूस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो. या रविवारी म्हणजे 16 जुलै दिवशी मेगाब्लॉक असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. हा मेगाब्लॉग तिन्ही मार्गांवर असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना रेल्वेचं हे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावं लागणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा-ठाणे स्लो लाईन वर, पश्चिम रेल्वे मार्गावर राम मंदीर ते बोरिवली स्थानकादरम्यान फास्ट लाईन वर आणि हार्बर लाईन वर सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे स्थानकादरम्यान ब्लॉक असणार आहे.
पहा ब्लॉकचं वेळापत्रक
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)