Mumbai Local Ladies Coach Fight Video: मुंबई लोकल मध्ये महिलांच्या डब्ब्यात झिंज्या उपटत तुंबळ मारहाणीचा व्हिडिओ वायरल; रेल्वे प्रशासनाकडू तपास सुरू

मुंबई लोकल मधील या मारहाणीत एक जण रक्ताने माखल्याचंही व्हिडिओ मध्ये दिसत आहे. दरम्यान हा प्रकार कोणत्या लाईन वरील आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.

Fight in Mumbai Local | (Photo Credits: X/@KhaneAnkita)

मुंब्रा रेल्वे स्थानकामध्ये लोकल मधील गर्दीने 5 प्रवाशांचे जीव गेल्याची घटना ताजी असतानाच लोकल मधील महिला प्रवाशांच्या तुंबळ मारहाणीचा व्हिडिओ वायरल झाला आहे. या व्हिडिओ मध्ये दोन महिला खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये दाराजवळच्या पॅसेज मध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटत तुंबळ मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एक महिला रक्तबंबाळ झाल्याचंही दिसत आहे. दरम्यान या दोघींना अन्य प्रवाशांनी एकमेकींपासून दूर केले. सोशल मीडीयात हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर ही घटना नेमकी कुठली आहे? याचा तपास सध्या रेल्वे प्रशासन घेत आहे.

मुंबई लोकल मध्ये महिला प्रवाशांत मारहाण

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement