Mumbai: घरमालकांनी भाडेकरूंची माहिती सिटीझन पोर्टलवर कळविणे आवश्यक; आदेशाचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई
भाडेकरूंच्या वेशात दहशतवादी, समाजविरोधी घटकांकडून विध्वंसक कृत्ये, दंगल, भांडण घडू नये म्हणून घरमालक, भाडेकरूंची तपासणी आवश्यक आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या कोणत्याही घराचा, मालमत्तेचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक घरमालक, जागा मालकांनी कोणत्याही व्यक्तीला राहण्यासाठी जागा भाड्याने दिली आहे किंवा सवलत दिली असेल, तर त्या भाडेकरूचा सर्व तपशील www.mumbaipolice.gov.in या सिटीझन पोर्टलवर ऑनलाइन कळवावा, असे पोलीस उपायुक्त (अभियान) विशाल ठाकूर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
भाडेकरूंच्या वेशात दहशतवादी, समाजविरोधी घटकांकडून विध्वंसक कृत्ये, दंगल, भांडण घडू नये म्हणून घरमालक, भाडेकरूंची तपासणी आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत. भाडेकरू परदेशी व्यक्ती असेल, तर घरमालक व परदेशी व्यक्ती यांनी नाव, राष्ट्रीयत्व, पासपोर्टचा तपशील, व्हीसा क्रमांक, श्रेणी, ठिकाण, जारी करण्याची तारीख, वैधता नोंदणीचे ठिकाण आणि शहरात राहण्याचे कारण नमूद करणे आवश्यक आहे. हा आदेश 5 सप्टेंबर 2023 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहितेनुसार दंडनीय असेल, असेही पोलिस उपायुक्त ठाकूर यांनी म्हटले आहे. (हेही वाचा: Farmers Protest In Mumbai: मुंबईमध्ये 26 जुलै रोजी शेतकरी आंदोलन; जालना-नांदेड द्रुतगती मार्गाच्या अन्यायकारक मोबदल्याविरोधात नोंदवणार निषेध)
घरमालकांनी भाडेकरूंची माहिती https://t.co/dsn0wMvQk2 या सिटीझन पोर्टलवर ५ सप्टेंबर २०२३ पर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत कळविणे आवश्यक असल्याचे मुंबई पोलिसांनी कळविले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर दंडनीय कारवाई केली जाईल. pic.twitter.com/uTVefAH5Ae
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 17, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 17, 2023 08:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

