Mumbai International Airport: मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात फुगे, पतंग, उंच उडणारे फटाके उडविण्यास 21 ऑगस्टपर्यंत बंदी

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही या परिपत्रकामध्ये स्पष्ट केले आहे.

Mumbai Police Logo | (Photo Credits: File Image)

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, जुहू एरोड्रोम, नौदल हवाई स्टेशन आयएनएस शिक्राच्या आसपासच्या मुक्त उड्डाणक्षेत्रात विमानाच्या दिशेने व धावपट्टयांच्या दृष्टीकोन मार्गात फुगे, उंच उडणारे फटाके, प्रकाश उत्सर्जित करणारी वस्तू, पतंग आदींमुळे विमानांचे सुरक्षित अवागमन धोक्यात येते. त्यामुळे बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यकक्षेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आजूबाजूच्या मुक्त उड्डाणक्षेत्रात उंच उडणारे फटाके उडवणे, प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या वस्तू सोडणे, पतंग उडवणे आणि लेझर बीम प्रकाशित करणे, फुगे, पॅराग्लायडर्स उडविण्यावर बंदीचे आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. 21 ऑगस्ट 2023 पर्यंत लागू करण्यात आले आहेत, असे पोलीस उपायुक्त, विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.

कोणत्याही विमानाच्या लँडिंग, टेक ऑफ आणि अवागमनामध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशाने अशा प्रकारच्या वस्तूंचा वापर केल्याचे लक्षात येताच कोणतीही व्यक्ती जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती देईल. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही या परिपत्रकामध्ये स्पष्ट केले आहे. (हेही वाचा: NCB-Mumbai: आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश, मुंबई एनसीबीची मोठी कारवाई)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now