Drugs | (Photo Credits: Twitter/ ANI)

आंतरराष्ट्रीत पातळीवर अंमली पदार्थांची म्हणजेच ड्रग्ज तस्करी करणाऱ्या एका टोळीचा (Drug Trafficking Syndicate) एनसीबी मुंबई (NCB-Mumbai) द्वारे पर्दाफाश करण्यात आला आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, या टोळीकडून 996 ग्रॅम वजनाच्या 2000 MDMA गोळ्या जप्त करण्यात आल्या. ज्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. धक्कादायक म्हणजे ही सत्करी विदेशी पोस्ट ऑफीस मुंबई (Foreign Post Office-Mumbai) येथून पार्सलद्वारे जप्त करण्यात आले.

एनसीबी मुंबई (NCB-Mumbai) ने आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त केले. जे एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते. आरोपींकडून जप्त करण्यात आलेले सर्व अंमली पदार्थ डार्कनेटद्वारे मागविण्यात आले होते आणि त्याबाबत केले गेलेले सर्व व्यवहार क्रिप्टोकरन्सीद्वारे मागविण्यात आले होते, अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

पोलिसांना 26 जून रोजी एका आरोपीला नालासोपारा येथून ताब्यात घेतले होते. जॉन संडे असे त्याची ओळख पटली असून तो आफ्रिकन असल्याचेही पुढे आले आहे. त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे खोटा भारतीय पासपोर्ट सापडला. एनसीबीने केलेल्या चौकशीत आरोपी जॉनने कबूल केले की त्याने हे सर्व अंमली पदार्थ मुंबई, दिल्ली, गोवा आणि इतर शहरांमध्ये वितरणासाठी आणले होते. आता त्याच्या सर्व सहकाऱ्यांची चौकशी केली जात आहेत. जे भारतभर आहेत. त्यासाठी एक मोहीमच राबविल्याची प्राथमिक माहिती आहे. (हेही वाचा, Mumbai Club Fight: मुंबई क्लबमध्ये बाऊन्सर्स आणि ग्राहकांमध्ये झाली जोरदार हाणामारी, पोलिसांकडून सात जणांना अटक (Watch Video))

ट्विट

एनसीबीच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांवरील राष्ट्रीय धोरण भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 47 मध्ये समाविष्ट असलेल्या निर्देशक तत्त्वांवर आधारित आहे, जे आरोग्यास हानीकारक असलेल्या मादक औषधांच्या औषधी उद्देशांव्यतिरिक्त, सेवन प्रतिबंधित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देतात. . या घटनात्मक तरतुदीतून वाहणाऱ्या विषयावरील सरकारचे धोरण या विषयावरील आंतरराष्ट्रीय अधिवेशनांद्वारे देखील मार्गदर्शन केले जाते.