Mumbai Dust Strom: मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले; अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह उठले धुळीचे लोट (Watch Video)
धुळीचे वादळ आणि पावसामुळे अनेक भागात दृश्यमानता लक्षणीयरीत्या कमी झाली होती. धुळीच्या वादळाचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.
Thane Rain: बदलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह बरसला अवकाळी पाऊस; नेटिझन्सनी कॅमेऱ्यात कैद केले खास क्षण)
आज मुंबई, ठाणेसह परिसरात हलका ते मध्यम तसेच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि गारपीट यांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार आज दुपारी मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी जोरदार वादळासह धुळीचे वादळ वाहू लागले. धुळीचे वादळ आणि पावसामुळे अनेक भागात दृश्यमानता लक्षणीयरीत्या कमी झाली होती. धुळीच्या वादळाचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर हवामान खात्यानेही सतर्कतेचा इशारा दिला आहे. सोमवारी मुंबईत सोसाट्याचा वारा सुटला. यामुळे रस्त्यावरील धूळ हवेत उडून सगळीकडे धुळच धूळ दिसत होती. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाटासह, वादळी वारे, धुळीचे लोट, पावसाच्या सारी यामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली. (हेही वाचा:पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Mumbai Rains: मुंबईत दमदार पाऊस, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा; आयएमडी हवामान अंदाज घ्या जाणून
Mumbai Weather Update: मुंबई, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी; पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्परुपाचा पाऊस पडण्याची शक्यता
Advertisement
Advertisement
Advertisement