Marathi Dandiya 2023: भाजपाकडून मुंबई मध्ये 300 पेक्षा अधिक ठिकाणी दांडिया, गरबा आणि भोंडला याचं आयोजन; अवधूत गुप्ते, फाल्गुनी पाठक, गीता रबारी ठरणार आकर्षण
दरवर्षी प्रमाणे मराठी दांडिया उत्सव अभ्युदय नगर काळाचौकी येथे अवधूत गुप्ते असणार आहे. 19-23 ऑक्टोबर दरम्यान त्याच आयोजन करण्यात आलं आहे.
भाजपाकडून मुंबई मध्ये 300 पेक्षा अधिक ठिकाणी दांडिया, गरबा आणि भोंडला याचं आयोजन केले जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये दरवर्षी प्रमाणे मराठी दांडिया उत्सव अभ्युदय नगर काळाचौकी येथे अवधूत गुप्ते असणार आहे. त्यांच्यासोबत दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक यांच्यासह मराठी आणि हिंदीतील नामवंत कलावंत हजेरी लावणार आहेत. मराठी दांडिया 19-23 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. अंधेरी येथील दांडियात ‘दांडिया क्वीन’ गीता रबारी तर वांद्रे पश्चिम येथील दांडियामध्ये प्रसिध्द बँड हनिफ असलफ यांचे खास आकर्षण असेल.
पहा ट्वीट
मुंबईकरांची सेवा करणाऱ्या मुंबई भाजपतर्फे यंदा ३०० हून अधिक ठिकाणी दांडिया, गरबा आणि भोंडला यांचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबईकरांचे खास आकर्षण असलेला मराठी दांडिया उत्सव अभ्युदय नगर काळाचौकी येथे १९ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत गायक अवधूत गुप्ते यांच्या आयोजनाद्वारे होणार आहे.… pic.twitter.com/14eLIiROgQ
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 17, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 17, 2023 02:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

