Mumbai Accident: मुंबईत भरधाव ट्रकची 4 दुचाकींना धडक, पाच जण गंभीर जखमी
सर्वांना सध्या शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती स्थानिकांनी दिली
पूर्व द्रुतगती मार्गावरील चुनाभट्टी येथे सिमेंट मिक्सर टँकरने चार दुचाकींसह एका मोटरगाडीला धडक दिली. त्या घटनेत पाच ते सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी आठच्या सुमारास ही घटना पूर्व द्रुतगती मार्गावरील चुनाभट्टी परिसरात घडली. शीव येथून भरधाव वेगात सिमेंट मिक्सर टँकर चेंबूरच्या दिशेने जात होता. मात्र सिमेंट मिक्सर टँकर चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने समोर जात असलेल्या चार दुचाकी आणि एका मारुती मोटरगाडीला धडक दिली. त्यानंतर टँकर दुभाजकाला धडकून पलटी झाला. (हेही वाचा - Mumbai Nashik Accident: मुंबई - नाशिक महामार्गावर कंटनेरची कारला धडक, धडकेत एकाचा जागीच मृत्यू)
या अपघातात पाच ते सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. सर्वांना सध्या शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.घटनेनंतर टँकर चालकाने पळ काढल्याची माहिती स्थानिकांनी दिली असून चुनाभट्टी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. या ट्रकने रस्त्यावरील तीन ते चार दुचाकींना धडक दिली. या भीषण अपघातात वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.
या भीषण अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमी रुग्णांना सायन रुग्णालयात दाखल केले आहेत. या भीषण अपघातात वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. या घटनेनंतर मिक्सर ट्रकचा चालक पसार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. अपघातानंतर रस्त्यावरील बघ्यांची गर्दी जमल्याचंही पाहायला मिळालं.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)