Mumbai Nashik Accident: मुंबई - नाशिक महामार्गावर कंटनेरची कारला धडक, धडकेत एकाचा जागीच मृत्यू

रात्रीच्या सुमारास वाहनचालकांचा ताबा सुटल्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावर अपघात झाला आहे. सुत्राच्या माहितीनुसार, या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Mumbai Nashik Accident:  मुंबई - नाशिक महामार्गावर कंटनेरची कारला धडक, धडकेत एकाचा जागीच मृत्यू
Accident (PC - File Photo)

Mumbai Nashik Accident: दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे.  रात्रीच्या सुमारास वाहनचालकांचा ताबा सुटल्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावर अपघात झाला आहे. सुत्राच्या माहितीनुसार, या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे आणि दोघ जण गंभीर जखमेत आहेत. जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार चालू असल्याचे माहीती समोर आली आहे.

अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव मौजम फायाजऊल्ल हुसेन अन्सारीव (वय वर्षे 31) असे  आहे. तर चैतन्य कासने (वय 24) , नशिर अली अबु अन्सारी (वय 33) , जयेश बाळाराम सपाट (वय 25) अशी जखमींची नावे आहेत.

कसा झाला अपघात ?

एका कारला मोठ्या कंटेनरचा धडक लागल्याने अपघात झाला. मुंबई नाशिक महामार्गावरिल पडघा जवळील खडवली फाट्याजवळ कारला कंटनेरचा जोरदार धडक लागली. त्यानंतर या कंटेनर चालकाने फरफटत नेलं. कार पुढच्या कडेला असलेल्या आईस्क्रीमच्या टेम्पोलाही धडकली. त्यामुळे एकाचा अपघाती मृत्यू झाला. आईस्क्रीमच्या टेम्पो जवळ उभे असलेल्या व्यक्तींना ही कार धडकली. या धडकेत तीन  जण जखमेत आहेत. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार असल्याचे समोर आले आहे.

पोलीसांनी या अपघाताची नोंद घेतली आहे. आणि कंटेनर चालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या दुदैवी अपघातात एकाने प्राण गमावले आहे. सुदैवाने कार मध्ये बसलेल्या लोकांचा जीव वाचला आहे. पडदा परिसरातील पोलीसांनी धाव घेत यावर तपासणी केली  आहे.  सकाळने या घटनेचे वृत्त दिले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 09, 2023 10:10 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).