Mumbai AC Local Train: एसी लोकलमुळे प्रवाशांना प्रचंड मनःस्ताप; 5.22 ची साधारण लोकल ठेऊन एसी गाडी रद्द करण्याची मागणी (Watch)
एसी लोकल ट्रेनमध्ये सकाळी आणि संध्याकाळी मोठी गर्दी असते.
सध्या मध्य रेल्वेचे प्रवासी एसी लोकल ट्रेनच्या सुरक्षित, आरामदायी आणि किफायतशीर प्रवासाचा आनंद घेत आहेत. गेल्या 6 महिन्यांत एसी लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत 6 पट वाढ झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. एसी लोकल ट्रेनमध्ये सकाळी आणि संध्याकाळी मोठी गर्दी असते. परंतु 5.22 ला सीएसटीहून सुटणाऱ्या एसी लोकलमुळे प्रवाशांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागत आहे. या एसी ट्रेनमुळे बदलापूरात प्रवाशांचा उद्रेक समोर आला. 5.22 ही साधारण लोकल ठेवावी आणि एसी लोकल रद्द करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)