Mumbai AC Local: स्टेशन आलं पण एसी लोकलचं दार उघडलचं नाही, संतापात पुढच्या स्टेशनला प्रवाशांना मोटरमॅनला कोंडलं
मुंबईच्या चर्चगेट स्टेशनवरुन उपनगरात जाणाऱ्या एसी लोकल नालासोपारा स्टेशनवर थांबली पण या स्थानकावर लोकल ट्रेनचे दरवाजे न उघडल्याने प्रवाशांमध्ये मोठी खळबळ बघायला मिळाली.
मुंबईच्या एसी लोकल प्रवासा दरम्यान एक अजब घटना घडली आहे. तरी तांत्रिक बिघाडामुळे ही धक्कादायक बाब घडल्याची माहिती मिळत आहे. मुंबईच्या चर्चगेट स्टेशनवरुन उपनगरात जाणाऱ्या एसी लोकल नालासोपारा स्टेशनवर थांबली पण या स्थानकावर लोकल ट्रेनचे दरवाजे न उघडल्याने प्रवाशांमध्ये मोठी खळबळ बघायला मिळाली. त्यातही हा प्रकार रात्री साडेअकराच्या सुमारास घडल्यानं प्रवाशांमध्ये आणखीचं संताप बघायला मिळाला. नालासोपारानंतर विरार स्टेशनवर ट्रेन थांबल्यानंतर या लोकल प्रवाशांनी थेट मोटरमॅनलाचं कोडलं. तरी विरार रेल्वे स्थानकावरचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)