Anant Ambani Radhika Merchant Engagement: मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा राधिका मर्चंटसोबत झाला साखरपुडा; See Photos
रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक परिमल नाथवानी यांनी ट्विटरवर ट्विट करून सर्वांना अनंत आणि राधिकाच्या साखरपुड्याची माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Anant Ambani Radhika Merchant Engagement: उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांची पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) यांचा साखरपुडा झाला असून येत्या काही दिवसांत ते विवाहबद्ध होणार आहेत. अनंतचे लग्न राधिका मर्चंटसोबत होणार आहे. हे कपल किती दिवसांनी लग्न करणार आहे? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अनंत आणि राधिका खूप दिवसांपासून एकत्र आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक परिमल नाथवानी यांनी ट्विटरवर ट्विट करून सर्वांना अनंत आणि राधिकाच्या साखरपुड्याची माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा राजस्थानमधील नाथद्वार श्रीनाथजी मंदिरात पार पडला. या आनंदाच्या प्रसंगी त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत सामील झाले. परिमल नाथवानी यांच्या ट्विटमध्ये या दोघांचा फोटो शेअर केला आहे. या अनंतने गुलाबी रंगाचा कुर्ता घातलेला असून राधिकाने बेबी पिंक लेहेंगा आणि सुंदर दागिने घातलेले दिसत आहेत. (हेही वाचा - Mukesh Ambani's Prediction On Indian Economy: 2047 पर्यंत भारत 40 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनू शकतो; मुकेश अंबानी यांची भविष्यवाणी)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)