MSRTC DA Hike: एसटी बस कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणेच महागाई भत्ता 28%, घरभाड्यातही वाढ; मंत्री अनिल परब यांची माहिती

राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी बुधवार (27 ऑक्टोबर) पासून पगारासह विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण केले. यावेळी नाशिकसह पुणे, कोल्हापूर, नागपूर, सोलापूर या ठिकाणी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते.

MSRTC Bus | (File Image)

एसटी बस कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणेच महागाई भत्ता 28% देण्याची तर घरभाड्यातही वाढ केली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. दरम्यान या घोषणेनंतर काल मध्यरात्रीपासून एसटीची  सेवा पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे. महागाई भत्ता देण्यात यावा, वार्षिक वेतनवाढ ही दोनवरून टक्क्यांवरून तीन टक्के करण्यात यावी. तसेच, या वेळचे वेतन दिवाळीपूर्वी मिळावे अशा मागण्यांसाठी कर्मचारी राज्यभर बुधवारपासून आंदोलनाला बसले आहेत.

Maharashtra State Road Transport Corporation ट्वीट  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement