Crop Insurance: दीड कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी भरला एक रुपयात पीक विमा- धनंजय मुंडे

केंद्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा भरण्यासाठी तीन दिवसांची मुदत आणखी वाढवून दिली आहे. दरम्यान, ही माहिती देतानाच राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले की, राज्यातील शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा भरण्यास उत्तम प्रतिसाद दिला असून आतापर्यंत दीड कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत

Dhananjay Munde | (Photo Credits: Facebook)

केंद्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा भरण्यासाठी तीन दिवसांची मुदत आणखी वाढवून दिली आहे. दरम्यान, ही माहिती देतानाच राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले की, राज्यातील शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा भरण्यास उत्तम प्रतिसाद दिला असून आतापर्यंत दीड कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत. तांत्रिक कारणांनी कोणत्याही शेतकऱ्यांचा विमा भरणे मागे राहू नये, यासाठी ऑनलाइन विमा अर्ज करण्यासाठी 3 दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. उर्वरित शेतकरी बांधवांनी आपला विमा अर्ज 3 ऑगस्टच्या आत ऑनलाइन भरून घ्यावा, असेही कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement