शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात 10 कोटी खर्च करून झाले मनी लाँड्रिंग? CM Eknath Shinde आणि इतरांची चौकशी करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल
आता या दसरा मेळाव्यात 10 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक खर्च करून मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप होत आहे.
दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्राने शिवसेना पक्षाचे दोन दसरा मेळावे पाहिले. भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा स्वतंत्र पहिला दसरा मेळावा होता. या मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्चही करण्यात आला होता. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवण्यासाठी एकनाथ शिंदे कॅम्प राज्याच्या विविध भागांतून राज्य परिवहन बस आणि खासगी बसमधून कार्यकर्त्यांना घेऊन आले होते. त्यासाठी एसटी महामंडळाला 10 कोटी रुपये रोख अदा करण्यात आल्याचे माध्यमांतून समजते, कॉंग्रेसने म्हटले होते.
आता या दसरा मेळाव्यात 10 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक खर्च करून मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप होत आहे. त्याबाबत सीएम एकनाथ शिंदे आणि इतरांची चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.