'NCP चे 'दादा' अजित पवार' या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर MNS कडून जुना व्हिडिओ पोस्ट
स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं ह्यासाठी 'राज ठाकरे' यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते. असेही मनसेने ट्वीट केले आहे.
शिवसेनेपठोपाठ एनसीपी मध्ये पडलेल्या फूटीनंतर निवडणूक आयोगाने आमदार, खासदारांच्या संख्याबळानुसार अजित पवारांना एनसीपी पक्षाचं नाव आणि घड्याळ्याचं चिन्ह दिलं आहे. पण एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या वेळेस अजित पवारांनी केलेल्या विधानांची आता चर्चा होत आहे. मनसे कडून त्यांचा जुना व्हिडिओ पोस्ट करत ''भुजां'मध्ये कितीही 'बळ' आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे 'तट' फोडून सत्तेसाठी घातलेला हा 'वळसा' महाराष्ट्राला 'पटेल' का? ' असा प्रश्न विचारला आहे. बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोप्प आहे पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं ह्यासाठी 'राज ठाकरे' यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते. असेही मनसेने ट्वीट केले आहे.
पहा ट्वीट