मनसेचा मुंबई, पुण्यातील मेळावा रद्द
काही कारणांमुळे मेळावा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मनसेने ट्विटरवरुन दिली आहे.
मनसेचा उद्या शनिवार, 23 ऑक्टोबर रोजी मुंबईत आणि 24 ऑक्टोबर रोजी पुण्यात होणारा मेळावा रद्द करण्यात आला आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे मेळावा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मनसेने ट्विटरवरुन दिली आहे. तसंच पुढील मेळाव्याची तारीख, वेळ व ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांची तब्येत बिघडल्यामुळे मेळावा रद्द करण्यात आल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे.
पहा ट्विट:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)