Sushant Singh Rajput Suicide Case: सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा; आमदार नितेश राणे यांची मागणी
आगामी काळात आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढू शकतात. दिशा सालियन आणि सुशांत सिंग मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंची (Aaditya Thackeray) नार्को टेस्ट व्हायला हवी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
Sushant Singh Rajput Suicide Case: दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Raput) ची माजी व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा उघड होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज नागपूर विधानसभेत पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे हे प्रकरण पुन्हा उघडण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत आगामी काळात आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढू शकतात. दिशा सालियन आणि सुशांत सिंग मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंची (Aaditya Thackeray) नार्को टेस्ट व्हायला हवी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. (हेही वाचा -Disha Salian Case: दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी करणार चौकशी, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा)
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी आमदार @meNeeleshNRane यांची मागणी. @DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/xbzYHuM2nw
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) December 22, 2022
"सुशांत सिंह राजपूत और दिशा सालियान मामले में आदित्य ठाकरे का नार्को टेस्ट होना चाहिए"
◆ BJP विधायक @NiteshNRane @iamvinodjagdale pic.twitter.com/WVhfh4cpKb
— News24 (@news24tvchannel) December 22, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 22, 2022 12:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

