MLA Geeta Jain Slapped Officer: आमदार गीता जैन यांना राग अनावर; मनपा अभियंत्याला कॉलर धरत लगावली कानशिलात (Watch Viral Video)

यावेळी अभियंता शुभम पाटील हा हसत असल्याचे आमदार गीत जैन यांच्या लक्षात आले व त्यामुळे त्यांना राग अनावर झाला आणि त्यांनी थेट पाटीलच्या कानशिलात लगावली.

MLA Geeta Jain Slapped Officer

आमदार गीता जैन यांनी मीरा-भाईंदर महापालिकेचा कनिष्ठ अभियंता शुभम पाटील याची कॉलर धरत त्याला कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मनपाच्या अभियंत्याने कुटुंब राहत असलेल्या घरावर कारवाई करण्यासाठी पथक पाठवले होते. या पथकात शुभम पाटील याचाही समावेश होता. घर तोडण्यासाठी पथक आल्यानंतर पीडित कुटुंबाने आमदार गीता जैन यांच्याकडे धाव घेतली होती.

त्यानंतर जैन यांनी मनापा अभियंत्याची कानउघडणी केली. 'त्या घरात लहान मुले आहेत, कुटुंब राहात आहे, आणि तुम्ही घर तोडायचे काम करता, तुम्ही माणसे आहात की राक्षस', असे म्हणत आमदार जैन या संबंधित अधिकाऱ्याची कानउघडणी केली. मात्र यावेळी अभियंता शुभम पाटील हा हसत असल्याचे आमदार गीत जैन यांच्या लक्षात आले व त्यामुळे त्यांना राग अनावर झाला आणि त्यांनी थेट पाटीलच्या कानशिलात लगावली. (हेही वाचा: लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या पुणे विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांचा जामीन अर्ज पुणे विशेष न्यायालयाने फेटाळला)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now