Maternity Leave During Probation: प्रोबेशन कालावधी दरम्यान महिलेला प्रसूती रजा नाकारली जाऊ शकत नाही- Maharashtra Tribunal

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण सदस्य मेधा गाडगीळ यांनी शुक्रवारी दिलेल्या निकालात म्हटले आहे की, राज्य हे एक कल्याणकारी आणि प्रगतीशील राज्य आहे, ज्याने प्रत्येक महिला कर्मचाऱ्याला 180 दिवसांच्या प्रसूती रजेची हमी दिली आहे.

Pregnant Women प्रतिकात्मक प्रतिमा (PC - ANI)

Maternity Leave During Probation: प्रोबेशन कालावधीत एखादी महिला गर्भवती असल्यास तिला प्रसूती रजा नाकारता येत नाही. महाराष्ट्राच्या न्यायाधिकरण न्यायालयाने ही माहिती दिली. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने मुंबईच्या तत्कालीन 28 वर्षीय सहायक वनसंरक्षकांना प्रसूती रजा नाकारणारा 2015 चा राज्य आदेशही रद्द केला. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने म्हटले आहे की, एखाद्या महिलेसाठी आई होणे हा तिचा मूलभूत मानवी आणि नैसर्गिक हक्क आहे. त्यामुळे तिला प्रसूती रजा मिळणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण सदस्य मेधा गाडगीळ यांनी शुक्रवारी दिलेल्या निकालात म्हटले आहे की, राज्य हे एक कल्याणकारी आणि प्रगतीशील राज्य आहे, ज्याने प्रत्येक महिला कर्मचाऱ्याला 180 दिवसांच्या प्रसूती रजेची हमी दिली आहे. सध्या एसजीएनपीमध्ये विभागीय वनसंरक्षक असलेल्या महिलेने गेल्या वर्षी अर्ज दाखल केला होता. प्रोबेशन पिरियडमध्ये असलेली महिला जर आई झाली तर तिलाही तिच्या नवजात बाळासोबत राहण्याचा अधिकार आहे, असे या अर्जात म्हटले होते. (हेही वाचा: Food Poisoning: मुंबई विद्यापीठात दूषित पाणी पुरवठा; 40 पेक्षा अधिक विद्यार्थिनींना उलटी, डोकेदुखीचा आजार)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)